रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (08:38 IST)

बाप्परे, कोरोना रुग्ण थेट आरोग्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत घुसला

अमरावतीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत कोरोनाचा रुग्ण घुसला. यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. अमरावतीच कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा सदरचा प्रकार घडला. 
 
कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ३५ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती पत्रकार परिषदेत घुसला. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसमोरच हा प्रकार घडल्याने अधिकाऱ्यांची धांदल उडाली. यावेळी, मला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यानंतरही जिल्हा रुग्णालयात दाखल न केल्याचा आरोप रुग्णाने केला. तसंच आरोग्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी त्याने केली. आरोग्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नसल्याचं तो म्हणाला.