10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना वेबसाईटवर सराव संच मिळणार
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता वेबसाईटवर सराव संच मिळणार असून, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याविषयीची माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही लिंक शेअर केली आहे. या लिंकवरूनच विद्यार्थ्यांना 10वी, 12वीचा सराव संच उपलब्ध होणार आहे. कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमच पूर्ण करावा लागलाय. या सरावसंचामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास शिक्षण विभागानं व्यक्त केला आहे.
इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी @scertmaha तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत.या प्रश्नपेढ्या https://t.co/Ugilxs0qsF या संकेतस्थळावर तयार होतील; तशा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
एप्रिल-मे महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रश्न संच उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार आहेत. परीक्षा कशा प्रकारे घ्यायच्या याबाबत राज्य सरकारकडून तयारी सुरु आहे. यासाठी सरकारने समिती देखील नेमली आहे. प्रश्नसंच साठी लिंकवर क्लिक करा - https://maa.ac.in/index.php?tcf=prashnpedhi
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक याआधी जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार असून दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे.