1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Doing so has resulted in a huge financial and mental strain on the students

असं केल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण

Doing
राज्यात MPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. “असं केल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे”, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत. 
 
“राजकीय पक्षांच्या रॅली चालू आहेत. आंदोलनं चालू आहेत. आम्ही सगळेच पक्ष आपापले कार्यक्रम करत आहोत. सत्तापक्षाच्या ट्रॅक्टर रॅली होत असतात. परीक्षेमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात असतं. सरकारने दिलेलं करोनाचं कारण अतिशय तकलादू आहे. त्यामुळे या कारणामुळे परीक्षा रद्द करणं अतिशय चुकीचं होईल. मराठा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल. पण आज या परीक्षा तात्काळ घ्यायला हव्यात”, अशी देखील प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पुढील लेख
पुण्यातही कोरोनाची गंभीर परिस्थिती तब्बल १ हजार ५०४ नवे करोनाबाधित सापडले