बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मार्च 2021 (18:30 IST)

काकी योग मुद्रा करण्याचे फायदे जाणून घ्या

योग मुद्रा करण्याचे दोन प्रकार आहे. पहिले आहे  हस्तमुद्रा आणि दुसरे मुख्य आसन. हस्त मुद्रा तर हाताने करतात. परंतु आसन मुद्रा हे शरीराच्या कोणत्या ही अवयवाने केली जाते. या आसन मुद्रेपैकी एक आहे काकी मुद्रा.चला या मुद्रेचे फायदे जाणून घेऊ या.
 
*काकी मुद्रा म्हणजे काय-
काक म्हणजे कावळा. या आसनांमध्ये कावळ्याच्या चोच सारखी मुद्रा बनवतात म्हणून ह्याला काकी मुद्रा असे म्हणतात. ही मुद्रा अनेक प्रकार केली जाते. येथे काही सामान्य प्रकार सांगत आहोत.   
 
मुद्रा बनविण्याची पद्धत -
कोणत्याही आसन मध्ये बसून ओठ पातळ नळीसारखे दुमडून कावळ्याच्या चोचीसारखे बनवून घ्या. नाकाच्या टोकाला बघा आणि लक्ष नाकावर केंद्रित करा. नंतर तोंडातून श्वास घेत ओठ बंद करा. काही वेळानंतर श्वास नाकाने सोडा. असं 10 मिनिटे करा. 
 
या मुद्रेचे फायदे- 
1 ही मुद्रा शरीरात शीतलता वाढवते, तसेच इतर रोगांना दूर करण्यात फायदेशीर आहे. 
 
2 या मुद्रेचा सतत सराव केल्याने शरीरात अन्न पचनाची प्रक्रिया तीव्र होते. 
 
3 ही मुद्रा केल्याने एकाग्रता वाढते. 
 
4 ही मुद्रा केल्याने सुरकुत्या कमी होतात. 
 
5 या मुद्रेचा सतत सराव केल्याने शरीरातील सर्व रोग नाहीसे होतात.  
 
6 उच्च रक्त दाब देखील नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहे.
 
7 हे आसन केल्याने आम्लपित्ताची वाढ कमी होते. ऍसिडिटीमध्ये हे फायदेशीर आहे. 
 
8 गुदा,पोट,घसा आणि हृदयाच्या विकाराला दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. 
 
9 या मुळे रक्त शुद्ध होतं आणि खरूच,उकळणे, मुरूम आणि त्वचेचे विकार दूर होतात. 
 
10 ही मुद्रा केल्याने झोप देखील चांगली येते.
 
खबरदारी -डोळ्यात ताण येतो. डोळ्यातील तणाव दूर करण्यासाठी  डोळे मिटून विश्रांती घ्या. निम्न रक्तदाब असल्याच्या स्थितीमध्ये काकी मुद्रा करू नये.