1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : बुधवार, 13 एप्रिल 2022 (08:42 IST)

प्रतियोगी परीक्षेत एकाग्रता वाढविण्यासाठी हे योगासन करा

for getting good result in competitive exam do this yogasan laifestyle  yogasan in marathi webdunia marathi
कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी दाखविण्यासाठी एकाग्रता राखणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा विद्यार्थी तणाव ग्रस्त असतात या मुळे त्यांना काहीही वाचन करून लक्षात ठेवणे अवघड होते. योगासन केल्याने हे तणाव कमी होऊ शकतात. या आसनांच्या सरावामुळे एकाग्रताच वाढत नाही तर मानसिक शांती देखील मिळते. चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे ते आसन.
 
1 पश्चिमोत्तानासन -
या आसनाचा सराव सकाळी करावा. जेवल्यानंतर हे आसन करू नये. असं केल्याने पोटावर ताण येऊ शकतो. सुरुवातीला हे आसन करायला त्रास होऊ शकतो, नंतर हे आसन करायला सोपे होईल. हे आसन करण्यासाठी पायाला पुढील बाजूस लांब करून वाकून पायांच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या आसनाचा सराव किमान 30 ते 40 सेकंद करा. 

2 उष्ट्रासन-
हे आसन मागील बाजूस केले जाते. या आसनांमध्ये मुद्रा उंटाच्या सम दिसते. उष्ट्रासन केल्याने शरीरातील चक्र चांगले राहतात, हे एकाग्रतेसह मनाला संतुलित करतो. हे नसांना सक्रिय करतो. आळस दूर करून दिवसभर ऊर्जावान बनवतो. हे आपल्या बिघडत्या जीवनशैलीला सुधारण्याचे काम देखील करतो. 
 
3 वृक्षासन -
हे आसन केल्याने आत्मविश्वास वाढतो. हे आपल्या मज्जासंस्थेला शांत करतो.हे करणे काहीच अवघड नाही. हे सुरुवातीला संतुलन करणे अवघड होते नंतर सराव झाल्यावर करणे सहज होते. वृक्षासन सहजपणे एक मिनिट केले जाऊ शकते. वृक्षासन मध्ये संतुलन राखण्यासाठी आपले लक्ष्य एखाद्या वस्तूवर केंद्रित करा. 
 
4 गरुड़ासन
हे आसन करायला खूप सोपे आहे. या आसनामध्ये शरीराचे संतुलन करण्यासाठी एकाग्रता लागते. ही एकाग्रता हे आसन केल्याने मिळते. हे आसन केल्याने पायाचे स्नायू देखील बळकट होतात. या मुळे सर्व नकारात्मक विचार नाहीसे होतात. सकारात्मक विचारांचा संचार होतो. किमान 10 सेकंद या आसनाचा सराव करावा.