गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (19:17 IST)

डोकेदुखी असल्यास हे योगासन करावे

योगावर प्रत्येक समस्येवरील उपचार शक्य आहे.कोणती ही समस्या उद्भवल्यास योग व्यायामाने उपचार सहज शक्य आहे. सध्याच्या काळात लोक बऱ्याच वेळ संगणकाचा वापर करत आहे. त्यामुळे डोकेदुखी उद्भवते. हा त्रास हळू-हळू वाढत जातो या मुळे अस्वस्थता जाणवते. कोणत्याही समस्येमध्ये आपण नेहमी औषधांवर अवलंबून राहू शकत नाही.म्हणून योगासन केल्यानं आराम मिळतो. या साठी काही विशिष्ट आसने आहेत जे या डोकेदुखीच्या त्रासापासून आराम देतात. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* बालासन - डोकेदुखीसाठी हे चांगले आसन आहे. हे केल्याने त्वरितच आराम मिळतो. हे आसन केल्याने संपूर्ण शरीर आरामाच्या  स्थितीत येतो. हे मज्जासंस्थेला आराम देण्याचे काम करतो. हे केल्याने कुल्हे,मांड्या,आणि टाचांमध्ये तणाव जाणवतो. हे डोके दुखीला कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. हे करायला सोपे आहे. म्हणून डोकेदुखी असल्यास काहीवेळा या आसनाचा सराव करावा.   
 
*पश्चिमोत्तानासन
पश्चिमोत्तानासन केल्याने डोकेदुखी सहजपणे नाहीशी होते. डोकेदुखीच्या व्यतिरिक्त जडपणा, तणाव इत्यादीमध्ये देखील याचा सराव केल्याने आराम मिळतो. कामावरून आल्यावर थकवा जाणवत असल्यास या आसनाचा सराव केला जाऊ शकतो. कामाच्या अधिक तणावामुळे डोकेदुखी होत असल्यास हे आसन केल्याने आराम मिळतो.
  
* मार्जरी आसन - 
याला कॅट पोझ देखील म्हणतात. हे केल्याने डोकेदुखी मध्ये आराम मिळतो. हे आसन थकलेल्या स्नायूंना आराम देतो, जे वेदनेपासून आराम देण्याचा चांगला मार्ग आहे. हे तणावाला दूर करतो आणि श्वसन क्रिया चांगली करतो, या मुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो. आणि डोकं हलकं होत.   
 
* पद्मासन- 
हे आसन केल्याने मनाला शांतता जाणवते. म्हणून डोकेदुखी जाणवत असेल तर त्वरितच या मुद्रेमध्ये बसावं.असं केल्याने आपल्याला लगेचच बरे वाटेल . हे आसन करण्यासाठी एखाद्या वेळेची वाट बघू नका.  हे आसन करायला सोपे आहे हे कुठेही बसून करता येत.बरेच लोक जमिनीवर बसण्याशिवाय खुर्चीवर बसून करणे देखील पसंत करतात .