शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (18:10 IST)

वृद्धावस्थेत तंदुरुस्त ठेवतात हे योगासन

जीवन हे खूप मौल्यवान आहे,. प्रथम बालपण, तारुण्य नंतर म्हातारपण. आयुष्यातील हे तीन खूप महत्त्वाचे टप्पे आहेत. तारुण्यानंतर आपण लगेच वृद्धावस्थेकडे जात असताना जीवनात अनेक त्रास सहन करावे लागतात. बरेच आजार आपल्या सभोवताली असतात, शरीरात अनेक प्रकारच्या वेदना असतात. अनेक गोष्टी वयाच्या 60 व्या वर्षी लोकांना त्रास देतात. आपल्याला फिट आणि तंदुरुस्त राहायचे असल्यास काही योगासने आहेत जे आपल्याला वयाच्या या टप्प्यात देखील  फिट ठेवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* छाती आणि खांदे बळकट होतात-  
योगासनाचे आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका आहेत जर आपल्याला आपल्या खांद्याला आणि छाती ला बळकट करायचे असल्यास तर या साठी वॉल पुशअप्स ची  म्हणजे भिंतीवरील होणाऱ्या पुशअप ची मदत घेऊ शकता. या साठी  भिंतीपासून तीन फुटाच्या अंतरावर उभे राहावे लागेल आणि नंतर दोन्ही तळवे भिंतीवर टेकवायचे आहे, शरीराला पुढे आणून वाकविण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळी कमीतकमी दहावेळा हे आसन करा या मुळे छाती आणि खांदे बळकट होतील. 
 
*खांदे वाकणार नाही -
जसं जसं वय वाढते बऱ्याच लोकांचे खांदे वाकू लागतात. अशा परिस्थितीत खांदे वाकू नये या साठी आपण खांद्याची स्ट्रेचिंग करू शकता.या साठी प्रथम जमिनीवर उभे राहा नंतर एका हाताला दुसऱ्या खांद्याकडे न्यायचे आहे नंतर दुसऱ्या हाताने दुमडलेल्या हाताच्या कोपऱ्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. असं केल्यानं  स्नायूंमध्ये ताण येईल आणि आराम मिळेल म्हणून आपण दररोज हे आसन करू शकता. 
 
* काहीही काम करा-
जेव्हा वय वाढते तेव्हा काम करणे थांबवतो आणि बसून जातो. असं करू नये. घरातील लहान कामे करावे. घरात बागेत काही काम करू शकतो.घरी बसून न जाता सकाळ संध्याकाळ बागेत किंवा घराभोवती  वॉक ला जाऊ शकता. असं केल्याने शरीर सक्रिय राहील आणि आपल्याला चांगले वाटेल.  
 
* पायांना विश्रांती मिळेल- 
वय वाढल्यावर सर्वात जास्त त्रास होतो तो पायांना. पाय दुखण्यापासून ते चालण्या पर्यंत त्रास होतात. अशा परिस्थितीत पायांसाठी व्यायाम करायला हवा. या साठी एका खुर्चीवर आरामात बसून एका पायाला वर उचलून पाउले फिरवा नंतर दुसऱ्या पायाने करा.असं केल्यानं पायाचे स्नायू बळकट होतात. असं आपण दररोज करू शकता.