गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (19:20 IST)

विश्रामासन चे फायदे जाणून घ्या तणावापासून मुक्ती मिळवा

हे आसन केल्यानं एखादा व्यक्ती स्वतःला पूर्ण विश्रामाच्यावस्थेत अनुभवतो. म्हणून या आसनाला विश्रामासन म्हणतात. ह्याचे दुसरे नाव बालासन देखील आहे. हे तीन प्रकारे करतात. पोटावर झोपून, पाठीवर झोपून आणि वज्रासनात बसून .इथे पोटावर झोपून करण्याची प्रक्रिया सांगत आहोत. हे काहीसे मकरासन सारखे आहे. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
कृती- 
पोटावर झोपून डावा हात डोक्याच्या खाली जमिनीवर ठेवा आणि मान उजवीकडे फिरवून डोक्याला हातावर ठेवा, डावा हात डोक्याच्या खाली असेल आणि डावा हात उजवा हाताखाली असेल. उजव्या पायाच्या गुडघ्याला दुमडून ज्या प्रकारे लहान बाळ झोपतो, तसे झोपून विश्रांती घ्या. याच प्रकारे दुसऱ्या बाजूने करा. 
 
खबरदारी - डोळे मिटून घ्या. हाताला सोयीस्करपणे डोक्याच्या खाली  ठेवा आणि शरीराला सैलसर सोडा. श्वास घेण्याच्या स्थितीत शरीराची  हालचाल करू नका. श्वास दीर्घ आणि आरामशीरपणाने घ्या. 
 
फायदे- 
1 श्वासाच्या स्थितीमध्ये मन शरीराने जुडलेले राहते, या मुळे कोणतेही बाहेरचे विचार उद्भवत नाही आणि मन आरामदायक स्थितीमध्ये राहतो. शरीर शांतता अनुभवतो. 
 
2 अंतर्गत अवयव तणावमुक्त होतात, ज्या मुळे रक्तपरिसंचरण व्यवस्थित सुरू राहतो. रक्त परिसंचरण सुरळीत झाल्यावर शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. 
 
3 ज्या लोकांना उच्च रक्तदाब आणि निद्रानाशेची समस्या असते अशा रुग्णांना बालासन केल्याने फायदा होतो.
 
4 पचन प्रणाली सुरळीत ठेवतो आणि अन्नाचे पचन करण्यास मदत करतो.  
 
5 शरीरातील सर्व प्रकारच्या वेदना दूर करतो.