मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:59 IST)

आकाश मुद्रा योग करण्याचे फायदे जाणून घ्या

मुद्रा आणि इतर योगासनाचे वर्णन करणारे सर्वात जुने पुस्तक म्हणजे घेरंड संहिता आहे. हठयोगाचा या ग्रंथ ला महर्षी घेरंड ह्यांनी लिहिले होते. घेरंड मध्ये 25 आणि हठयोग प्रदीपिका मध्ये 10 मुद्रांचा उल्लेख केला आहे. परंतु योग ग्रंथांच्या आसनाला मिळून एकूण 50 ते 60 हस्तमुद्रा आहेत.
या पैकी एक आहे आकाश मुद्रा चला आपण ह्याचे फायदे जाणून घेऊ या.
आकाश मुद्रांचे नाव आकाश मुद्रा या साठी ठेवले आहे. कारण या मध्ये आकाशाची वैशिष्टये आहेत. ही मुद्रा करताना ह्याचा संबंध हृदयाशी आहे. कारण हे करताना हाताच्या मधल्या बोटांचा वापर केला जातो. ह्या बोटाचा संबंध हृदयाशी असतो. आकाश मुद्रा योगाची ती मुद्रा आहे. जे शरीराच्या पंच घटकांमधून आकाश घटकाला वाढवतो आणि आकाश घटकांपासून होणाऱ्या आरोग्याच्या समस्येला कमी करत. आयुर्वेदानुसार आरोग्याशी निगडित कोणतीही समस्या, पंचतत्त्व, वात, पित्त आणि कफाच्या असंतुलनामुळे उद्भवते.      
 
आकाश मुद्रा आसन कसं करावं-
 
1 आकाश मुद्रा आसन -
ध्यान लावून एका आसनावर बसा आणि जीभ तोंडात दुमडून टाळूला स्पर्श करा आणि शांभवी मुद्रेचा सराव करा. डोकं हळू-हळू मागे वळवा आणि आसन पूर्ण करा.
 
2 आकाश हस्त मुद्रा - 
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासन, पद्मासन किंवा सुखासनात बसा. आता दोन्ही हाताच्या मध्य हाताचे टोक अंगठ्याच्या टोकाला जोडा. हे दररोज 10 ते 15 मिनिटा साठी 3 वेळा करा.
 
मुद्रा बनविण्याची पद्धत -
आकाश मुद्रा करण्यापूर्वी वज्रासनात बसावं. नंतर अंगठ्याच्या टोकाला मधल्या बोटाच्या टोकाशी जोडा. इतर बोट सरळ ठेवा. ही मुद्रा आकाश मुद्रा आहे.    
 
कालावधी -
या दोन्ही मुद्रा सुरुवातीच्या काळात 1 मिनिटांपासून वाढवून कमीतकमी 5 मिनिटापर्यंत करा. दिवसातून फक्त 3 वेळा असं करावं. सराव झाल्यावर वेळ वाढवू शकता.  
 
दोन्ही आसने करण्याचे फायदे-
1 या मुद्राचा सराव करणाऱ्याला चैतन्य आणि सामर्थ्य मिळते.
2 हे मनाला शांती देतो. मनात सकारात्मक विचार संचारतात.
3 हे केल्याने आज्ञाचक्रात ध्यान लागते.
4 या मुळे हाडे बळकट होतात.  
5 हृदयाचे सर्व आजार दूर होण्यात मदत मिळते.  
6 छातीत दुखण्या पासून  फायदा होतो.
7 कान दुखणे, कान वाहणे इत्यादी त्रास नाहीसे होतात.  
8 हे आसन केल्यानं ऐकण्याची शक्ती वाढते.
9 उच्च रक्तदाबातही ही मुद्रा फायदेशीर आहे.
10 शरीर जाड झाले असल्यास ही मुद्रा फायदेशीर आहे.  
11 शरीराला विषारी घटकांपासून मुक्ती मिळते.
12 वात, पित्त आणि कफामध्ये संतुलन स्थापित होत, परंतु वात प्रकृतीच्या लोकांनी ही मुद्रा करू नये.
13 आकाश मुद्रा केल्यानं शरीरात ऊर्जा येते.
14  मधल्या बोटाला शनीचे बोट मानले आहे. अग्नी आणि शनी एकत्र आल्यावर आध्यात्मिक शक्ती तीव्र होते, जे आध्यात्मिक आणि सांसारिक यशाच्या प्राप्तीसाठी आवश्यक आहे.
 
सावधगिरी- 
* या मुद्रेचा सराव चालता-चालता करू नये.  
* ही मुद्रा जेवताना कधीही करू नये.  
* मुद्रा बनवून कधी ही हाताला उलट करू नये.  
* ही मुद्रा करताना धैर्य बाळगा.  
* वात प्रकृतीच्या लोकांनी ही मुद्रा करू नये. या मुळे गॅस, त्वचेचा कोरडेपणा, संधिवातासारखे त्रास उद्भवू शकतात.