मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (19:39 IST)

कपालभाती योगासनाचे फायदे जाणून घेऊ या, घरात सराव कसा करावा

निरोगी राहण्यासाठी योग आपल्या नित्यकर्मात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. योगाच्या माध्यमाने मन आणि मेंदू शांत ठेवता येत. तसेच शरीर ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. प्राणायामात कपालभातीचे खूप महत्त्व आहे. ह्याचा नियमित सराव आपल्याला आजारापासून दूर ठेवण्यात मदत करत. 
आम्ही योग प्रशिक्षक संगीता दुबे  ह्यांच्याशी संवाद साधला आणि कपालभातीच्या विषयी जाणून घेतले तसेच ह्याला घरी कसं करावं हे जाणून घेतले. चला तर मग जाणून घेऊ या.
 
योग प्रशिक्षक संगीता दुबे सांगतात की कपालभाती हा प्राणायामाचा एक भाग आहे. या मध्ये वेगाने श्वास सोडण्याची क्रिया केली जाते. या मुळे विविध आजार बरे होतात. कपाल भाती हे दोन शब्दाच्या मिश्रणाने बनले आहे. कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे वेगवान. कपालभाती प्राणायाम केल्यानं शरीरातील सर्व अंग सर्व प्रकारे काम करण्यात सक्षम असतात आणि रक्त शुद्ध करतात. 
 
कपाल भाती घरी कसं करावं  -
 * सर्वप्रथम आपल्या मणक्याचे हाड सरळ ठेवून पद्मासनात किंवा सुखासनात किंवा वज्रासनात बसावं. आपले हात गुडघ्यावर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या. 
 
* श्वास बाहेर सोडत पोटाला आतमध्ये ओढा. पोटावर हात ठेवून पोटातील स्नायू आकुंचन होताना जाणवेल. नाभी आत ओढा. 
 
* पोटातील स्नायू सैल सोडतातच श्वास आपोआप आपल्या फुफ्फुसांपर्यंत  पोहोचतो. 
 
* कपालभाती 5 मिनिटांपासून सुरू करून 10 आणि 30 मिनिटं करू शकतो. 
 
* कपालभाती प्राणायाम करताना श्वास मोठ्याने बाहेर सोडा. 
 
* श्वास घेण्याची खूप काळजी करू नका.
 
* आपण पोटातील स्नायू सैल सोडतातच, आपोआप श्वास घेऊ लागाल. 
 
कपालभाती करण्याचे फायदे- 
 
* हे पचन सुधारते आणि पोषक घटक वाढवते.
 
* वजन कमी करण्यात मदत करते. 
 
* नाडी शुद्ध करते.
 
* रक्त शुद्ध करते आणि चेहऱ्यावरील तेज वाढवते. 
 
* मेंदू आणि मज्जासंस्थेस ऊर्जा देते. 
 
* मन शांत करते. 
 
* ऍसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.