1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
  4. Jataka Katha The Story of the Turtle

जातक कथा : कासवाची गोष्ट

Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक नदी होती व नदीला लागून एक तळे होते, ज्यातील प्राणी त्यांच्या मनाप्रमाणे नदीत पोहू शकत होते.
 
एकदा  जलचर प्राण्यांना नैसर्गिकरित्या दुष्काळाची सूचना मिळाली. म्हणून, जेव्हा तलावातील जलचर प्राण्यांना दुष्काळ पडण्याची शक्यता जाणवली तेव्हा ते दुसऱ्या नदीकडे पळून गेले. फक्त एक कासव उरला होता, तो विचार करत होता. "मी इथेच जन्मलो मी इथेच वाढलो माझे आईवडीलही इथेच राहत होते मी इथून कुठे जाणार?"
काही दिवसांत, तलावाचे पाणी वाळले आणि फक्त ओल्या चिखलाचा दलदल उरला. एके दिवशी, एक कुंभार आणि त्याचे मित्र मातीच्या शोधात तिथे आले आणि कुदळी वापरून माती गोळा करू लागले आणि त्यांच्या टोपलीत ठेवू लागले. तेवढ्यात, कुंभाराच्या कुदळीने चिखलाने माखलेल्या कासवाच्या डोक्यावर आदळले. मग कासवाला त्याच्या आसक्तीचे दुष्परिणाम जाणवले आणि तो मरत असताना म्हणाला  जर मी वेळीच ही हा तलाव सोडून गेलो असतो तर ही वेळ आली नसती. व तो प्राण सोडतो. 
तात्पर्य : योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय आपल्याला सावरून घेतो. 
पुढील लेख
Ginger Halwa या हिवाळ्यात आल्याच्या शिर्‍याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा