मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)

रक्तातील साखर नियंत्रित करतात हे 2 योगासन

योगा केल्यानं अनेक रोगांशी लढण्यात शक्ती मिळते. या मुळे शरीरात स्फूर्ती आणि ऊर्जा मिळण्यासह रोगांपासून प्रतिबंध होतो.
संशोधनाच्या मते, शरीराला आतून बळकट करण्यासाठी योगा करणे खूप फायदेशीर आहे. हे शरीरात रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते. आजच्या काळात चुकीच्या जीवनशैली आणि चुकीच्या खाण्या-पिण्याने मधुमेहाची समस्या मोठे असो किंवा लहान असो प्रत्येक वयो गटाच्या लोकांमध्ये आढळून येत आहे. अशा परिस्थितीत योगासन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते.चला तर मग आज आम्ही अशा काही 2 योगासनां बद्दल सांगत आहोत जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
 
1 धनुरासन-
ब्लड शुगर किंवा मधुमेहाच्या रुग्णांना धनुरासन करणे फायदेशीर आहे. या मुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासह स्नायू आणि हाड बळकट होतात. तसेच वजनाला नियंत्रित करण्यात मदत मिळते. चला जाणून घेऊ या करण्याची पद्धत.
 
1 सर्वप्रथम जमिनीवर चटई घालून पोटावर झोपा.
2 पाय आणि हात हळुवार वर उचला.
3 पाय उचलून गुडघे दुमडा आणि हात मागे करून दोन्ही पायाच्या टाचांना धरा.
4 धनुरासनच्या मुद्रांमध्ये किमान 15 ते 20 सेकंद राहा.  
5 नंतर पुन्हा सामान्य स्थितीत येऊन, ह्या आसनाची पुनरावृत्ती करा.
 
2 वृक्षासन-
हे आसन वृक्षाच्या मुद्रेत सरळ उभे राहून केले जाते. या मुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत मिळते. श्वासाशी निगडित काहीही त्रास असल्यास तेही दूर होतील आणि स्नायू आणि हाड देखील बळकट होण्यासह मेंदू शांत होऊन वजन कमी करण्यात मदत मिळते. चला हे आसन करण्याची पद्धत जाणून घेऊ या.
 
1 सर्वप्रथम जमिनीवर चटई अंथरून सरळ उभे राहा.
2 आता डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा.
3 शरीराचे वजन संतुलित ठेवा.
4 दोन्ही हात वर करून हाताला नमस्कारच्या मुद्रेत ठेवा.
5 किमान 30 सेकंद ह्याच मुद्रेत राहून दीर्घ श्वास घ्या. 
6 ह्या आसनाची पुनरावृत्ती किमान 3 ते 5 वेळा करा. नंतर दुसऱ्या पायाने देखील हे आसन करा.