मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (17:40 IST)

नेहमी निरोगी आणि ऊर्जावान राहण्यासाठी हे योगासन करा

जेव्हा आपण नियमितपणे योगासन करता तेव्हा आपले शरीर आणि मन निरोगी राहते. आपल्या योगासनांच्या वेळी आपल्या जोडीदाराला देखील समाविष्ट केले तर दोघेही निरोगी राहाल आणि आपले परस्पर समनव्यय चांगले राहील. 
 
योगासन  एकटेच नव्हे तर गटात किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या साहाय्याने केला जातो. जर आपण इच्छिता की आपला जोडीदार देखील तंदुरुस्त असावा. तर आपण मिळून योगासन करा. सध्या जोड्याने योग करणे खूप प्रचलित आहे. या मध्ये विशेष काहीच करावयाचे नाही. केवळ दोघांनी मिळून आसन करायचे आहे. या मुळे आपण ऊर्जावान राहाल आणि  निरोगी राहाल. चला तर मग जाणून घेऊ या आसनाबद्दल.
 
1  वृक्षासन-
ह्या आसनाला ट्री पोझ असे ही म्हणतात. हे असं आसन आहे ज्यामध्ये व्यक्तीला एकापायावर उभे राहून स्वतःला संतुलित ठेवायचे असते. बऱ्याच लोकांना अधिक काळ वृक्षासनात स्वतःला धरून ठेवणे कठीण आहे. अशा परिस्थितीत आपला जोडीदार एकमेकांच्या जवळ राहून सहजपणे या आसनात संतुलन साधू शकता. 
 
2 नौकासन -
बोट पोझ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आसनामुळे पचन क्रिया सुरळीत राहते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा आणि हळू-हळू शरीरावरून 30 डिग्री चा कोण बनवा. या स्थितीत जेवढे जास्त वेळ थांबता येईल त्याचा फायदाच होतो. परंतु जास्त वेळ या आसनाला धरून ठेवणे अशक्य आहे.
या प्रकरणात एक मेकांना धरून हे आसन करण्यासाठी एकमेकांचा हात धरून ठेवा. या मुळे  अधिक वेळ हे आसन करू शकाल. परंतु जेव्हा हे आसन कराल तर नौकासनात 45 डिग्रीचे कोण बनवा.
 
3 सुखासन- 
प्राणायाम करताना सर्वप्रथम सुखासनात बसतात, पण असं दिसून येत की काहीच वेळात पाठ दुखायला लागते आणि पोश्चर चुकीचे होत, या मुळे प्राणायामाच्या तितका फायदा मिळत नाही जेवढे मिळाले पाहिजे. अशा परिस्थितीत दोन्ही साथीदाराने एकमेकांच्या पाठीला पाठ लावून सुखसानाचा सराव करावे. या मुळे आपली पाठ ताठ राहील आणि पोश्चर देखील चांगले राहील. या शिवाय हे आसन जोडीने केल्याचा फायदा असा आहे की जेव्हा आपण एकमेकांच्या पाठीला पाठ लावता तर या मुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, आणि त्याचा खूप फायदा मिळतो. 
 
4 उष्ट्रासन -
हे देखील जोडीदारासह केले तर त्याचा फायदा होतो. आणि हे आसन खूप प्रभावी आणि सोपे होत.उष्ट्रासन करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसावं. आता मागच्या बाजूने आपल्या पंज्यांना धरून शरीराला वर उचलून धरण्याचा प्रयत्न करा. लक्षात असू द्या की गुडघे जमिनीवर असावे. कंबर वाकलेली असावी आणि नजर आकाशाकडे असावी.
हे आसन केल्याने खूप तणाव येतो जर जोडीदाराने अमोर-समोर बसून पाय मिळवून या आसनाचा सराव केला तर या मुळे पायाला अलगद आधार मिळतो आणि या स्थितीत बऱ्याच काळ टिकून राहता येत.