मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (17:25 IST)

हे योगासन थॉयराइड नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे

जेव्हा देखील आरोग्य आणि तंदुरुस्ती  बद्दल बोलले जाते त्या साठी योगासनच श्रेष्ठ आणि उपयुक्त मानले आहे. शरीरातील असा कोणता ही आजार नाही ज्याच्या वर काही योगासन नाही. कंबर दुखी, मानदुखी, पाठीचे दुखणे असा कोणता ही आजार नाही किंवा दुखणे नाही ज्यासाठी आसन नाही. अशा प्रकारचा एक आजार आहे थॉयराइड. थॉयराइड आता एक सामान्य आजार झाला आहे. आपल्या गळ्यामध्ये फुलपाखरूच्या आकाराची एक ग्रंथी असते जी हार्मोन्स तयार करते. थायराक्झीन नावाचे  हार्मोन जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हायपर थायराईडीझम होतो. या आजारामुळे रुग्णाला काळजी, तणाव जाणवतो.स्मरणशक्ती कमकुवत होते, लक्ष केंद्रित होण्यास त्रास जाणवतो. हे काही आसन आहे जे या थॉयराइड च्या आजारासाठी उपयुक्त आणि प्रभावी आहे.चला तर मग त्यांच्या बद्दल जाणून घेऊ या.
 
1 भुजंगासन -
   
हे आसन केल्यानं गळा आणि मानेचा भाग ताणला जातो. हे आसन थॉयराइड ग्रंथीचे कार्य वाढविण्यात मदत करतात. विशेषतः हायपो थायराईडीझम असणाऱ्या रुग्णांना हे योगासन फायदेशीर आहे.
 
कसं करावं -
पोटावर झोपा. तळहात खांद्यांच्या खाली ठेवा. श्वास घ्या आणि तळहाताच्या साहाय्याने शरीराला वर उचला. गुडघे वाकवा आणि पायांना वर करा. पायाची बोटे चांगल्या प्रकारे ताणा. नंतर हळुवार श्वास सोडा आणि आपल्या पूर्ववत स्थितीमध्ये या.  
 
2 नाडी शोधन प्राणायाम-
हे योगासन केल्यानं थॉयराइड पासून सुटका तर होतेच, शरीरात रक्त विसरणं सहजरीत्या होत.
 
कसं करावं-
उजव्या हाताची बोटे तोंडासमोर ठेवा. अनुक्रमणिका बोट आणि मधले  बोट कपाळाच्या मधोमध हळुवार ठेवा.अंगठा उजव्या नाकपुडीवर अनामिका डाव्या नाकपुडीवर ठेवा. प्रथम एक नाकपुडी बंद करून दुसऱ्याने श्वास घ्या आणि दुसऱ्या बाजूने देखील अशीच पुनरावृत्ती करा. हे योगासन किमान 30 मिनिटे करा.  
 
3 बालासन - 
ह्या आसनाला चाइल्ड पोझ देखील म्हणतात. हे आसन केल्यानं तणाव किंवा उच्च रक्तदाबापासून सुटका मिळते. हे आसन केल्याने शरीरात रक्त विसरणं चांगले होते. हे आसन करताना श्वसन प्रक्रियेवर लक्ष ठेवतात, जे तणाव आणि ताण कमी करण्यात मदत करतात.
 
कसं करावं- 
हे आसन करण्यासाठी  जमिनीवर गुडघ्यांवर बसा. पाय सरळ करून टाचांवर बसा. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. श्वास सोडा आणि कंबरेपासून वाका. पोटाला मांडीवर स्पर्श करा.पाठ पुढे ताणा. हात पुढे घेऊन जा जेणे करून पाठीत ताण जाणवेल. कपाळ जमिनीला स्पर्श करा. शक्य असल्यास तेवढेच ताण द्या.
 
4 उष्ट्रासन- 
या आसनामध्ये शरीर उंटाची मुद्रा बनवतो. हे आसन केल्याने मानेवर दाब पडतो. हे आसन थॉयराइडच्या ग्रंथींना उत्तेजित करते आणि हार्मोनचे उत्पादन वाढवते. 
 
कसं करावं -
हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसा. दोन्ही पाय समोर पसरवून घ्या हळुवार गुडघे दुमडून वज्रासनात बसा.मागे वाकून दोन्ही हाताच्या तळहाताने पायाच्या टाचांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.हळुवार पणे शरीर उंच करा.दोन्ही हात कंबरेवर ठेवून मागील बाजूला वाकवून डोकं वाकवा. काही वेळ याच अवस्थेमध्ये राहा नंतर पूर्वस्थितीमध्ये या.
  
5 नौकासन -
या आसनाचा सर्व करताना शरीर नावेच्या स्थितीत असतो. ह्याच्या सरावाने थॉयराइडच्या रुग्णाच्या गळ्यावर एक सकारात्मक दाब पडतो. ह्या आसनाचा सराव किमान 1 मिनिटे करा. सतत श्वासोच्छ्वास घेण्याचा सराव करा.या आसनाच्या सरावा मध्ये काहीही समस्या असल्यास आपण गुडघे देखील दुमडू शकता. 
 
कसं करावं - 
हे आसन करताना पाठीवर सरळ झोपा दोन्ही पाय आणि मान वर उचलून शरीराला नावाचा आकार द्या, हात पायाकडे न्या. या अवस्थेत किमान 30 सेकंद तसेच राहा नंतर शवासनाच्या स्थितीत येऊन विश्रांती घ्या.