शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (16:04 IST)

म्हातारपणात देखील हृदयाला तरुण ठेवणारे हे 5 योगासन

आजच्या काळात, धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या आजारानं वेढला आहे. अशा परिस्थितीत आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घेण्यासह आपल्या दैनंदिन कामात देखील काही बदल करण्याची गरज आहे. जेणे करून निरोगी राहता येईल. या साठी सर्वप्रथम हृदयाची काळजी घेण्याची गरज आहे. हृदय निरोगी राहील तरच मनुष्य चांगले आयुष्य जगू शकेल. या साठी दररोज काही योगासन करून देखील शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त बनवू शकतो. असं केल्यानं शरीराशी निगडित होणाऱ्या त्रासापासून आराम मिळेल. चला तर मग अशा 5 योगासनांबद्दल जाणून घेऊ या. जे आपण सहजपणे करू शकता.  
 
1 ताडासन -
हे सर्व आसनांमध्ये सोपे आसन म्हणवले जाते. दररोज मोकळ्या हवेत ताडासन केल्याने स्नायूंमध्ये ताण येतो. हृदय बळकट होतो. हे आसन करताना दीर्घ श्वास घ्यावा लागतो. असं केल्यानं फुफ्फुस प्रसरण पावतात त्यामुळे फुफ्फुसांची स्वच्छता चांगल्या प्रकारे होते. या मुळे श्वासाच्या समस्यांपासून आराम मिळतो. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहून आपले दोन्ही हात वर करून संपूर्ण शरीराला वर ओढा. या साठी आपण टाचा देखील वर करू शकता. याच अवस्थेत किमान 2 ते 4 मिनिटे राहून दीर्घ श्वास घेऊन सामान्य मुद्रेत परत या.  
 
2 त्रिकोणासन-    
दररोज हे आसन केल्यानं हृदयाचे आरोग्य सुधारते. शरीराला योग्य वजन मिळण्यासह तणाव कमी होण्यात मदत मिळते. हे आसन करताना दीर्घ श्वास घेतला जातो. हे आसन दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहा. पायांमध्ये अंतर ठेवा. मणक्याचे हाड वाकवून खाली वाका आणि डाव्या हाताने पायाला स्पर्श करा. उजवा हात वरच्या बाजूला सरळ करा. डोकं वर करून उजव्या हाताला बघा. या मुद्रेत किमान 15 ते 20 सेकंद तसेच राहा नंतर सरळ उभे व्हा. अशा प्रकारे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने करा.     
 
3 वृक्षासन-
हे आसन केल्यानं शरीराला संतुलन करण्यात मदत मिळते. खांदे रुंद होण्यासह श्वासाशी निगडित त्रास दूर होतात. शरीरात रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे हृदय चांगल्या प्रकारे काम करतो. या आसन मधील मुद्रा एका वृक्षासारखी असल्यानं एकाग्रता वाढण्यात मदत मिळते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा. उजवा गुडघा दुमडून उजव्या तळपायाला डाव्या मांडीवर ठेवा. नंतर हाताला वर करून नमस्कारेंच्या मुद्रेमध्ये जोडून घ्या. या परिस्थितीत शरीराचे सर्व वजन डाव्या पायावर असल्यामुळे त्याला सरळ ठेवून संतुलन राखा.
 
4 सेतुबंधासन-
हे आसन करताना दीर्घ श्वास घेतात. हे आसन केल्यानं श्वासाशी निगडित त्रास दूर होतात. छाती जवळ रक्ताचे प्रवाह योग्य होतात. हे करण्यासाठी जमिनीवर चटई अंथरून पाठीवर झोपा नंतर दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवा. हात जमिनीवरून उचलून पायाला धरून पाय आत दुमडून तळपाय जमिनीला स्पर्श करा. हळू-हळू श्वास घेऊन  कंबर आपल्या क्षमतेनुसार वर उचलून शरीराला पुलाच्या आकारात आणा. हळू-हळू श्वास घेत 10 ते 30 सेकंद ह्याच स्थितीमध्ये राहा. नंतर श्वास सोडत पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.
 
5 वीरभद्रासन-
हे आसन केल्यानं शरीरात रक्त परिसंचरण चांगल्या पद्धतीने होत. तणाव कमी होऊन मनाला आतून शांती मिळते. हे आसन केल्यानं पाठीमध्ये ताण होतो. अशा परिस्थितीत कंबर, खांदे, हात आणि स्नायू बळकट होतात. हृदय चांगल्या प्रकारे काम करत. हे आसन करण्यासाठी सरळ उभे राहून दोन्ही पायात किमान 4 फुटाचे अंतर राखा. आता हळू-हळू डाव्या पायाला किंचित वाकवून उजवा पाय पुढे करा आणि दोन्ही पाय किंचित वाकवून घ्या. हाताला नमस्कारेंच्या मुद्रेत ठेवून हात वर करा. या स्थितीत थोड्या वेळ तसेच राहून  सामान्य स्थितीत पुन्हा या.