मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (18:31 IST)

शांततेसाठी सकाळी उठल्यावर हे योगासन करा

आजकाल तणाव जणू मानवी जीवनाचा एक भाग बनला आहे. अगदी लहान मुले देखील ताण तणाव घेतात.जेष्ठांच्या आयुष्यात तर किती समस्या येतात. तणाव कोणत्याही समस्यांचे समाधान नाही. डोकं शांत असेल तर कोणत्याही समस्येचे समाधान मिळू शकेल. डोकं शांत ठेवण्यासाठी आपण योगाचा आधार घेऊ शकता. डोकं शांत ठेवण्यासाठी आपण काही योगासन करू शकता जेणे करून आपले डोकं शांत राहील . चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे ते योगासन.  
 
1 उत्तानासन-
हे आसन मानसिक शांतीसाठी केले जाते. हे करण्यासाठी सर्वप्रथम उभे राहा. दोन्ही पाय एकत्र करून खाली वाका. वाकताना हे लक्षात ठेवा की पाय दुमडू नये. हाताने जमीन स्पर्श करा.दीर्घ श्वासाचा सराव करताना आपले संपूर्ण लक्ष मेंदूवर केंद्रित करा. असं किमान 25 ते 30 सेकंद पर्यंत करा.हे आसन दररोज करा.
 
2 पद्मासन -
या आसनाला लोटस पोझ देखील म्हणतात. पद्मासनात बसल्यावर माणसाची मुद्रा कमळा सम दिसते. म्हणून ह्याला पद्मासन म्हणतात. प्राचीन काळात ध्यान करण्यासाठी ऋषी मुनी देखील या आसनात बसणे पसंत करायचे कारण हे केल्याने मन आणि मेंदू शांत राहतो. हे करण्यासाठी मांडी घालून खाली बसावे. पायांना एकमेकांवर फुली करून बसा. डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या.
 
3 भ्रामरी प्राणायाम- 
जर आपलं डोकं नेहमी अशांत राहते, किंवा आपण जास्त विचार करता. तर आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायला पाहिजे. हे करण्यासाठी आपण मांडी घालून सरळ बसा. आता डोळे आणि तोंड बंद करून दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना दोन्ही कान बंद करा. हे प्राणायाम आपण 10 ते 15 वेळा करा.
 
4 ताडासन- 
हे आसन केल्याने देखील मेंदू शांत राहतो . हे केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. हे आसन करायला सहज आणि सोपे आहे. याचा सराव दररोज सकाळी करावा.हे करण्यासाठी सरळ उभे राहा. हाताला आकाशाकडे करत एकमेकांमध्ये इंटरलॉक करून वळवून घ्या.नंतर पंज्यांवर उभारून शरीराला वरील बाजूस ताणून घ्या.असं केल्याने आपल्याला खूप छान वाटेल.