बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified मंगळवार, 9 मार्च 2021 (19:36 IST)

योगासन करताना हे 10 नियम अवलंबवावे

योगाभ्यास एक प्राचीन भारतीय पद्धत आहे. हे मानसिक आणि शारीरिक आरोग्य वाढवते. नियमितपणे योग केल्याने शरीर आणि मन निरोगी आणि सुंदर राहते. परंतु योगा करताना काही सावधगिरी बाळगायची आहे. जेणे करून आपण योगासनांचा पुरेपूर फायदा घेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 योगासन नेहमी मोकळ्या जागेत करा ताज्या हवेत योग करणे सर्वोत्तम मानले आहे. 
 
2 योगासन करताना शरीराला तयार करावे. या साठी शरीर वॉर्मअप करावे  किंवा हलके व्यायाम करावे. यामुळे शरीर लवचीक होईल आणि योगासन करायला सोपे होईल.
 
3 योगासनांची सुरुवात कठीण आसनांपासून करू नका.असं केल्याने शरीराला काहीही इजा किंवा दुखापत होऊ शकते. 
 
4 योगा करताना संवेदनशील आणि नाजूक असलेले अवयव जसे की कमकुवत गुडघे,मणक्याचे हाड, मानेची विशेष काळजी घ्या. आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास हळू-हळू त्या आसनाच्या अवस्थेतून बाहेर पडावे.
 
5 योगा करताना नेहमी सैलसर कपडे घाला. आपण टी-शर्ट किंवा ट्रॅक पॅन्ट घालून देखील योगा करू शकता. 
 
6 लक्षात ठेवा की कोणतेही असं करताना हिसका किंवा जोर द्यायचा नाही. या व्यतिरिक्त योग तेवढेच करा जेवढे शक्य आहे. हळू-हळू सराव वाढवा. अचानक जास्त योगा करू नका. 
 
7 योगासन करताना गळ्यात साखळी,घड्याळ, ब्रेसलेट काढून टाका. हे आपल्याला योगा करताना अडथळे आणू शकतात. किंवा या मुळे आपल्याला इजा होऊ शकते. 
 
8 3 वर्षा खालील मुलांनी योगासन करू नये. 3 -7 वर्षाचे मुलं हलके योगासन करू शकतात. 7 वर्षावरील मुलं प्रत्येक योगासन करू शकतात.गर्भावस्थेत कठीण आसन आणि कपाल भाती अजिबात करू नये.  
 
9 योगासन करताना थंड पाणी पिऊ नका. असं करणे आपल्यासाठी धोकादायक असू शकते. योगा करताना शरीरात उष्णता येते. अशा परिस्थितीत थंड पाणी प्यायल्याने सर्दी,पडसं,कफ आणि ऍलर्जी होऊ शकते. म्हणून योगासन केल्यावरच सामान्य पाणी प्यावे. 
 
10 योगा करताना तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. आपण एखाद्या आजाराने ग्रस्त असल्यास ,त्या पासून सुटका मिळविण्यासाठी योगा करत आहात तरी देखील एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.