मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (22:02 IST)

ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांची पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी रविवारी 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांत परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका पत्राद्वारे परीक्षार्थींना आवाहन केलंय. परीक्षार्थींनी धीर देण्याचा आणि गुणवत्तेलाच प्राधान्य असल्याचा विश्वास देण्याचं काम टोपे यांनी केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन टोपे यांनी एका पत्राद्वारे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छापर संदेश दिला आहे.  
 
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे, फक्त गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांन केलंय.