संबंधित माहिती
- विरार मध्ये इमारतीची भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू
- मुंबई वसतिगृहाच्या एका खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला
- राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश
- पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मान्सून लांबणार
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेला 18 जुलैपासून
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 18 जुलैपासून परीक्षा सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत लेखी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत होईल. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही 18 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
12 वीची सर्वसाधारण आणि द्विलक्षी विषयांची परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होईल तर व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान होईल.
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम रुपात मान्य असतील. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे तसेच इतर साईटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले किंवा व्हॉट्सअॅप मेसेज आणि तत्सम माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे आवाहन सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.
