मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (11:42 IST)

वसतिगृहातील तरुणीची हत्या करून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

Mumbai News मुंबईत मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील 18 वर्षीय तरुणीची हत्या करून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर अतिप्रसंग झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
 
संबंधित तरुणी मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीत राहात होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार आल्यावर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी तपास केला तेव्हा खोलीतच विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्याची माहिती देण्यात येत आहे. 
 
ओढणीने गळा आवळून या तरुणीची हत्या करण्यात आल्याचे समजते तर खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. अशा परिस्थीमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा संशय येत आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर काय ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
 
दरम्यान तेथील सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. ओमप्रकाश कनोजिया असे त्याचे नान असून सीसीटीव्हीवरून तो आरोपीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या खिशात दोन चाव्या देखील सापडल्या आहेत. ओमप्रकाश गेल्या 15 वर्षांपासून अधिक काळ वसतिगृहात कामाला होता.
 
मृत तरुणी मुळची अकोल्याची असून येथे वांद्रेच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात पोलिटेक्निकलचे शिक्षण घेत होती. येत्या दोन दिवसांमध्ये ती गावी जाणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचे तिकीट देखील काढले होते. मात्र त्याआधीच तिची हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.