शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 21 जुलै 2023 (21:31 IST)

ज्वेलरी शो रुममधून महिला कर्मचाऱ्यानेच केले ११ लाखांचे दागिने लंपास

कॉलेजरोडवरच्या ज्वेलरी दुकानातील महिला सेल्समनने ११ लाख ७० हजार रूपये किमतीचे हिरे जडित दागिने लंपास केले.
 
काजल अविनाश आहेर (२३ रा.गुरूद्वाराजवळ,नाशिक) असे दागिणे चोरुन नेणा-या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जिनेंद्र अजित शहा (रा. कॉलेजरोड) यांनी फिर्याद दिली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांचे कॉलेज रोडवरील समर्थ ज्युस सेंटर समोर तेजस्वी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गेल्या अनेक वर्षापासून सदर महिला सेल्समन म्हणून काम पाहते. ६ मे ते १७ जून दरम्यान सदर महिलेने मालकाचे व अन्य कामगारांचे लक्ष नसल्याची संधी साधून दुकानातील सुमारे ११ लाख ७० हजार रूपये किमतीचे हिरे जडीत अलंकार चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.