सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (21:06 IST)

नाशिक : कर्मचाऱ्याकडून मालकाला तब्बल अडीच कोटीचा गंडा

बनावट बँक खाते उघडून कर्मचाऱ्यानी मालकास तब्बल अडीच कोटी रूपयांना गंडा घातला आहे. कारखान्यातील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यानी  ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक मधील सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल जगन्नाथ पवार, भूषण दिलीप पवार, सागर शालिन पाटील, आकाश नामदेव वारूंगसे, निरज मोहिनीराज खेडलेकर, देवेंद्र केदार शर्मा व विशाल पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी जगदिश मोतीलाल साबू (रा.कमलनगर, हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. साबू यांचा सातपूर औद्योगिक वसाहतीतील श्याम सुंदर हॉटेल समोरील डी ७३ या भूखंडावर कारखाना आहे.
 
२३ नोव्हेंबर २०२० ते १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान कारखान्यातील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या संशयितांनी कारखान्यात उत्पादीत केलेल्या मालाच्या व्यवहारातील रकमेचा तसेच बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर कंपनीच्या नावे सातपूर येथील सेंट्रल बॅकमध्ये खाते उघडून हा अपहार केला आहे. या घटनेत तब्बल दोन कोटी ६२ लाख ८३ हजार ३८२ रूपयांच्या रकमेचा स्व:ताच्या फायद्यासाठी संशयितांनी अपहार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले असून यात कारखानामालकाची मोठी फसवणुक करण्यात आली आहे. 

Edited By - Ratnadeep Ranshoor