बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (10:52 IST)

लातूर येथे मामाने 13 दिवसाच्या भाचीचा खून केला

लॉकडाऊनच्या दरम्यान गुन्ह्यांच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार लातूरमध्ये समोर आला आहे. मामाने 13 दिवसाच्या भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिमुकली मुलगी सतत रडत असल्याने चीड येऊन मामानेच जीव घेतला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
 
आरोपी मामा कृष्णाने 13 दिवसांच्या गोंडस चिमुकलीला पाण्याच्या बँरेलमध्ये टाकून तिचा खून केला. झरी बुद्रूक इथली एक महिला बाळंतपणासाठी झरी इथे माहेरी आली होती. 13 दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. शनिवारी सकाळी अचानक घरातून ही मुलगी गायब झाली. यामुळे घरातील व्यक्तींनी मुलीचा शोध घेतला. परंतू ती कुठेही आढळून आली नाही.
 
काही वेळानंतर घरातील पाण्याच्या टाकीत सदर मुलीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासात चिमुकलीचा मामा कृष्णा अंकूश शिंदे वय 19 याने ती चिमुकली सतत रडत असल्याने चीड येऊन चिमुकलीला पाण्याच्या बँरेलमध्ये टाकून खून केल्याचे समोर आलं. याप्रकरणी 24 तासानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.