शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (09:00 IST)

तेजी नोंदवल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण

तेजी नोंदवल्यानंतर  सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारात सोने 0.22 टक्के स्वस्त झाले आणि 10 ग्राम (1 तोळा) सोन्याचा दर 51 हजार 665 रुपयांवर स्थिरावला. तर चांदीचा दर 1 टक्के कमी होऊन प्रति किलोचा भाव 66 हजार 821 रुपये झाला.
 
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दराने ऐतिहासिक पातळी गाठली होती. तर चांदीची 70 हजारांच्या पार गेली होती. मात्र गेल्या 15 दिवसात सोने-चांदीचा दर खाली येत आहे. सोने जवळपास 4500 रुपयांनी खाली आले आहे. गेल्या 5 दिवसातही सोन्याचा दरात उतार पाहायला मिळाला. परंतु काल बुधवारी सोने 900 रुपये तर चांदी 3500 रुपयांनी महाग झाले होते. आता गुरुवारी यात घसरण पाहायला मिळाली.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कालच्या तेजीनंतर आज सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या. सोन्याचा दर प्रति औस 1,952.11 डॉलरवर स्थिरावले. चांदी प्रति औस 27.30 डॉलर तर प्लॅटिनम 924.29 डॉलरवर स्थिरावले.