मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (09:29 IST)

१३ पर्यटक कुलंग किल्ल्यावर अडकले

13 tourists stranded at Kulang fort Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
कुलंग किल्ला हा पर्यटनासाठी व गिर्यारोहकांमध्ये प्रसिद्ध असून आता या किल्ल्यावर १३ पर्यटक अडकले आहेत.  नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कुलंग किल्ला आहे. या पर्यटकांच्या सुटकेसाठी बचाव पथक दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

इगतपुरीच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. रविवारी १३ पर्यटक कुलंग किल्ल्यावर फिरायला गेले होते. मात्र पावसामुळे किल्ला उतरत असताना पर्यटकांना वाट सापडली नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुलंग किल्ला हा कळसूबाई पर्वतरांगेच्या पश्चिमेला नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात आहे. हा किल्ला मदनगड आणि अलंग किल्ल्यांना लागून असून अलंग मदन कुलंग हे किल्ले पर्यटकांचे खास आकर्षण आहेत. कुलंग किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांमध्ये ३ मुले, ८ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या पर्यटकांनी पहाटे ३ वाजता जिल्हा प्रशासनाला संपर्क केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.