1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (17:16 IST)

वाशिम जिल्ह्यात 13 वर्षीय मुलावर अत्याचार

वाशिम जिल्ह्यात शिक्षकाने विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कारंजामध्ये ही घटना घडली असून, एका नराधमाने शिक्षकी पेशालाच काळीमा फासला आहे.
 
शिक्षकाने विध्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक बाब वाशिम जिल्ह्याच्या कारंजातील एका शाळेत समोर आली आहे.
 
शाळेतील एका विद्यार्थ्यानेच अत्याचारांची वाच्यता केली असून, 13 वर्षीय पीडित मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. पीडित मुलगा कारंजा येथील शाळेत मागील तीन वर्षांपासुन शिक्षण घेत असून, त्याच्यासोबत सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  
 
तिथे अजय भगवानराव पाठक (वय 45 वर्ष, रा. औंढा नागनाथ) हा शिक्षक असुन, तो मुलांसोबतच शाळेमध्ये राहायला आहे. 22डिसेंबर रोजी रात्री 10.45 वाजता शिक्षक अजय पाठक याने पीडित मुलाला हातपाय चेपायला बोलावुन घेतलं आणि जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केला.
 
प्राप्त झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी अजय पाठकला अटक केली.