सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (20:57 IST)

हौसिंग सोसायटीच्या चेअरमनने केली 15 लाखांची फसवणूक

नाशिक  :- हौसिंग सोसायटीच्या चेअरमनने त्याच्या अधिकाराचा गैरवापर करून सोसायटी सभासदांच्या सुमारे 15 लाख 35 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शिवाजी पोपट घोटेकर (वय 58, रा. सरिता अपार्टमेंट, गज्जर पार्क, टाकळी रोड, द्वारका) असे फसवणूक करणाऱ्या सोसायटी चेअरमनचे नाव आहे. याबाबत नारायण तुकाराम खाडे (वय 52, रा. इंद्रजित हौसिंग सोसायटी, डी. के. नगर, गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की द्वारका येथील शंकरनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या सभासदांनी मोठ्या विश्वासाने चेअरमन म्हणून आरोपी शिवाजी घोटेकर यांची नेमणूक केली होती; मात्र चेअरमन घोटेकर यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून वेळोवेळी गैरव्यवहाराची नोंद करून हौसिंग सोसायटीच्या 15 लाख 35 हजार 226 रुपयांचा अपहार करून संस्थेच्या सभासदांचा विश्वासघात करून फसवणूक केली.
 
हा फसवणुकीचा प्रकार दि. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीत घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चेअरमन शिवाजी घोटेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.