शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (06:26 IST)

मालेगावमध्ये मागील भांडणाची कुरापत काढून १७ वर्षीय तरुणाचा खून

murder knief
मालेगाव – शहरातील रमजानपुरा पोलिस स्थानकाच्या हद्दीत मागील भांडणाची कुरापत काढून दोघा तरुणांनी १७ वर्षाच्या समीर अस्लम शहा सुलेमान शहा याला चाकूने भोसकून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

समीर याच्या घरातील सगळे लोक बाहेरगावी गेलेले असतांना तो घरी एकटाच होता. त्याचवेळी मागील भांडणीची कुरापत काढत दोघे अल्पवयीन तरुणांनी त्याला पकडून ठेवत त्याच्यावर चाकूने वार केले. त्यातच त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor