सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (11:54 IST)

fire in Delhi's Narela Industrial Area दिल्लीच्या नरेला औद्योगिक परिसरात भीषण आग , अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर

fire
दिल्लीतील नरेला इंडस्ट्रियल एरियातील एका इमारतीला मंगळवारी आग लागली.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर आहेत.या अपघातात काही जण जखमी झाल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यांची ओळख पटवली जात आहे.ही आग फुटवेअर कारखान्यात घडली.आगीचे कारण शोधले जात आहे.अजूनही काही लोक आत अडकल्याची भीती आहे.  
 
आग लागल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.जीव वाचवण्यासाठी लोकांनी इमारतीबाहेर धाव घेतली मात्र आग इतकी भीषण होती की काही जण जळून खाक झाले.अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी9 .35  वाजता कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळाली.
 
हा कारखाना नरेला इंडस्ट्रियल एरियाच्या ई-ब्लॉकमध्ये तीनशे चौरस मीटर परिसरात पसरलेला आहे.या तीन मजली कारखान्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागली. 

Edited by : Smita Joshi