सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शिलाँग , शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (16:41 IST)

शिलाँग मार्केटला भीषण आग, 84 दुकाने जळून खाक

fire
मेघालयच्या राजधानीत शुक्रवारी एका मार्केट कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत किमान 84 दुकाने जळून खाक झाली. पहाटे 4 च्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणली. लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याचे एका दुकानदाराने सांगितले.
 
शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असावी, अशी भीती अग्निशमन विभाग आणि शिलाँग म्युनिसिपल बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक आमदार अम्पारिन लिंगडोह घटनास्थळी पोहोचले. आमदार आज मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांची भेट घेतील आणि बाधित दुकानदारांचे स्थलांतर करण्याबाबत चर्चा करतील. 

Edited by : Smita Joshi