मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मे 2024 (12:21 IST)

Narendra Dabholkar Murder : 2 जणांना जन्मठेप, पुराव्याअभावी मुख्य आरोपीसह तिघे निर्दोष, 11 वर्षांनंतर निकाल

dabholkar
महाराष्ट्रातील प्रसिद्ध नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनंतर महत्त्वाचा निकाल लागला आहे. पुणे सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील दोन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, मात्र मोठी बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. विनोद तावडे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्याशिवाय विक्रम भावे आणि संजीव पुनाळकर यांचीही पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे.
 
जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये शरद काळसकर आणि सचिन अंदुरे यांचा समावेश आहे. दोघांना प्रत्येकी 5 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यात फिरत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पुणे पोलिसांनी केला होता, मात्र नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. तपास यंत्रणेने 2016 मध्ये तपास करून आरोपपत्र दाखल केले होते. तब्बल 8 वर्षांच्या सुनावणी, साक्ष, युक्तिवादानंतर आज निकाल जाहीर झाला.