मंगळवार, 5 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (22:07 IST)

मतिमंद निवासी शाळेत अन्नातून विषबाधा, २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

death
नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील  इगतपुरी तालुक्यातील मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विषबाधेतून दोन विद्यार्थीची प्रकृती गंभीर असून या दोघांनाही नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी महाविद्यालय तसेच रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र या विद्यालयांमध्ये ही घटना घडली आहे.
 
या विद्यालयात एकुण १२० विद्यार्थी असून मंगळवारी रात्री त्यांनी खिचडीचे खाल्ली. त्यानंतर बुधवारी पहाटे यातील ८ विद्यार्थ्यांना उलटल्यांचा त्रास झाला. त्यानंतर त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दोन विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या विषबाधेतून हर्षल गणेश भोईर (वय २३ रा. भिवंडी) आणि मोहम्मद जुबेर शेख (वय १० रा. नाशिक) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर देवेंद्र बुरुंगे (१५) व प्रथमेश बुवा (१७) या दोन विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना मोठ्या प्रमाणावर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवत आहे. या निवासी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी तातडीने सुरु करण्यात आली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. खाल्लेल्या अन्नाचे नमुने जमा करण्यात आले असून तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आले आहे.