सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (15:04 IST)

Swine Flu :बारामतीतील महिलेचा पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू

सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळत आहे. बारामतीतील एका 52 वर्षीय महिलेचा स्वाईनफ्लूमुळे पुण्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बारामतीतील अशोकनगर येथे राहणारी या महिलेला 25 जुलै पासून सर्दी पडसे ,अंगदुखी चा त्रास होत होता. सदर महिला 23 जुलै राजी महाबळेश्वर फिरायला गेली होती त्यावेळी महिलेला संसर्ग लागण्याचे सांगत आहेत. त्यानंतर महिलेने बारामती शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी विविध तपासण्या देखील केल्या होत्या. खाजगी डॉक्टरांमार्फत या महिलेला औषधे देखील सुरु करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने, बारामती शहरात स्वाईन फ्लूची तपासणी नसल्याने, पुणे इथल्या केईम हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली. 3 ऑगस्ट रोजी स्वाईन फ्लूची तपासणी पॉझिटिव्ह आली. या महिलेवर केईम हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. परंतु, याच दरम्यान 4 ऑगस्ट रोजी या महिलेचा मृत्यू झाला.परंतु तिच्या मृत्यूची माहिती 15 दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर जाहीर करण्यात आली.