गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 15 जुलै 2021 (20:08 IST)

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून 2200 जादा गाड्या सोडणार

कोकणातील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2200 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहे. 14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला निघणार आहेत.कोकणात जाण्यासाठी 16 जुलैपासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.  
 
कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.