मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (12:12 IST)

दिलासादायक बातमी !राज्यात 57 लाख रुग्ण कोरोना मुक्त झाले,10373 रुग्ण बरे झाले

शनिवारी राज्यात कोविड -19  चे 8,912 नवीन रुग्ण आढळले आणि संक्रमणामुळे 257 ​​लोकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्यांची संख्या कमी होऊन 59,63,420 आणि मृतांचा आकडा 1,17,356  इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
 
विभागाने म्हटले आहे की यापूर्वी 8 मार्च रोजी राज्यात 8,744 प्रकरणे नोंदली गेली. दिवसभरात 10,373  रूग्णांना सोडण्यात आले असून,राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या वाढून 57,10,356, इतकी झाली असून, राज्यात सध्या रूग्णांची संख्या 1,32,597 पर्यंत खाली आली आहे.
 
महाराष्ट्रातील रूग्णांचे रिकव्हरी दर आता 95.76टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.97टक्के आहे. विभागानुसार 2,34,379 नवीन चाचण्या करून राज्यात  आतापर्यंत चाचणी घेण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 3,93,12,920 वर पोहोचली आहे. 
 
राज्यात एकूण 8,06,506लोक सध्या गृह विलगीकरणात आहे, तर आणखी  4,695 रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. मुंबई शहरात संसर्गाचे 676 नवीन प्रकरणे आले आहे आणि 13 मृत्यूच्या नवीन घटना घडल्या  असून महानगरात संक्रमणाची एकूण संख्या 7,19,266 आणि मृतांचा आकडा 15,279 झाला आहे.