मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (10:17 IST)

Petrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, डिझेलची किंमत 100 रुपयांच्या अगदी जवळ

पेट्रोल डिझेलच्या किंमती आज 10 जून 2021: आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे राजस्थानमधील श्री गंगानगर आणि मध्य प्रदेशमधील अनुपपूरमध्ये पेट्रोल 106 रुपयांच्या पुढे गेले. त्याचबरोबर श्रीगंगानगरमध्ये डिझेल प्रतिलिटर 100 रुपयांपासून 50 पैशांच्या अंतरावर आहे. आज गुरुवारी दिल्लीत पेट्रोल 95.56 रुपये प्रति लीटर, तर डिझेल प्रति लिटर 86.47 रुपये दराने विकले जात आहे. 4 मेनंतर अवघ्या २२ दिवसांत पेट्रोल 5.24 रुपयांनी महाग झाले आहे. यापूर्वी 20 दिवसांत डिझेल प्रतिलिटर 5.17 रुपयांनी महाग झाले आहे. पाच राज्यांमधील निवडणुकांची अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी देण्यात आली. यानंतर, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी अखेर 27 फेब्रुवारी 2021 रोजी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 17 पैशांची वाढ केली. यानंतर, दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ त्याच्या किंमतीत कोणतीही वाढ झाली नाही.
 
SMSद्वारे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या
SMSद्वारे आपण दररोज आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देखील तपासू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> 9224992249 नंबरवर पाठवू शकतात आणि एचपीसीएल (HPCL) ग्राहक HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवू शकतात. बीपीसीएल ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवू शकतात.