शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (11:16 IST)

पेट्रोल-डिझेल रेकॉर्ड स्तरावर, 37 दिवसांत 21 वेळा वाढले भाव, 4 महानगरांमधील किंमती काय आहेत ते जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलचे दर मंगळवारी स्थिर राहिल्यानंतर बुधवारी पुन्हा नव्या विक्रमी पातळीवर गेले. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोल 25 पैशांनी आणि डिझेल 27 पैशांनी महागले आहे.
 
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या अग्रगण्य तेल विपणन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय राजधानीत बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे  25-25 पैशांनी वाढून अनुक्रमे 95.56 आणि 86.47 रुपये प्रतिलिटर झाले आहेत.
 
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 4 मेपासून आतापर्यंत 21 दिवस वाढविण्यात आल्या आहेत, तर उर्वरित 16 दिवसांच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या काळात दिल्लीत पेट्रोल 5.16 रुपयांनी तर डिझेल  5.74 रुपयांनी महागले आहे.
 
मुंबईत पेट्रोल 24  पैशांनी वाढून 101.76 रुपये, चेन्नईमध्ये 23 पैशांनी वाढून 96.94 रुपये आणि कोलकातामध्ये 24 पैशांनी वाढून 95.52 रुपये प्रति लिटर महाग झाले. मुंबईत डिझेल 27 पैशांनी, चेन्नईमध्ये 23 पैसे आणि कोलकातामध्ये 25 पैशांनी महागला आहे.
 
डिझेलच्या एका लिटरची किंमत मुंबईत 93.85 रुपयांवर गेली आहे. कोलकातामध्ये 89.32 रुपये आणि चेन्नईमध्ये 91.15 रुपये झाली आहे.
 
राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशातील जवळपास सर्वच जिल्हे आणि तेलंगणाच्या काही भागात लेहमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे.