बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (15:29 IST)

मुंबईत पेट्रोलची शंभरी पार, पेट्रोल आणि डिझेलचे दराचे नवीन विक्रम

पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. देशातील 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. केवळ या वर्षाबद्दल बोललो तर आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज पेट्रोल 26.31 पैसे प्रति लीटर महाग झाले आहे, तर डिझेलच्या दरात 26-28 पैशांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल प्रति बॅरल $ 72 च्या वर व्यापार करीत आहे, त्यामुळे किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
जूनमध्ये चौथ्यांदा किंमती वाढल्या
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर डिझेल 94  रुपयांच्या जवळपास पोचला आहे. जूनमध्ये आतापर्यंत किंमतीत 4 पट वाढ झाली आहे. याआधी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मे महिन्यात 16 वेळा वाढविण्यात आल्या. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मेपासून सलग 4 दिवस वाढ करण्यात आली होती, तर निवडणुका झाल्यामुळे पहिल्या 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शांतता होती. मे महिन्याच्या संपूर्ण महिन्यात दिल्लीत पेट्रोलचा दर 4.09 रुपयांनी महागला आहे. या महिन्यात डिझेल 4.68 रुपयांनी महाग झाले आहे.
 
मुंबईत पेट्रोल 101 रुपयांवर पोहोचले!
दिल्लीत पेट्रोल आज प्रति लिटर 95.31 रुपये दराने विकले जात आहे. मुंबईसारख्या इतर शहरांमध्ये पेट्रोल 101.52 रुपये आहे, कोलकातामध्ये पेट्रोल 95.28 रुपये आहे. आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 96.71 रुपयांवर विकले जात आहे. 
 
4 मेट्रो शहरांमध्ये Petrol-diesel च्या किमती
मुंबई:  101.52 ली. पेट्रोल, 93.58  ली.डिझेल
दिल्ली:  95.03  ली. पेट्रोल, 86.22  ली.डिझेल
चेन्नई:  96.71 ली. पेट्रोल,  90.92  ली.डिझेल
कोलकाता: 95.28 ली. पेट्रोल, 89.07  ली.डिझेल
 
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमती आणि परकीय चलन दरांच्या आधारे दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सुधारणा करतात.