बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 6 जून 2021 (19:36 IST)

मुंबईत सोमवारपासून सर्वसामान्यांसाठी ‘BEST’ बससेवा सुरू!

तब्बल दोन महिन्यानंतर मुंबईत सोमवारपासून अखेर सर्वसामान्यांसाठी बेस्टची बसेसवा सुरू होत आहे.
 
नियम
कोणत्याही बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसतील. 
मास्कचा वापरणे अनिवार्य असणार. 
मुंबईत लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित राहणार.
या बसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत.
बस मात्र १०० टक्के प्रवासी क्षमतेसह धावणार. 
बेस्ट बसमधून एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्यास परवानगी.
सोशल डिस्टन्सिंगचं बंधन पाळणं आणि तोंडाला मास्क लावणं बंधनकारक.
सर्व बसेस योग्य रीतीने सॅनिटाराईज केलेल्या असतील.
प्रवासात नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
 
सोमवारपासून मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी एसटीने अतिरिक्त 250 बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. 
 
या बसेस पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावणार आहे. 142 बसेस विशेषतः मंत्रालय, 15 बसेस महापालिका भवन मार्गावर धावणार आहेत. उर्वरित बसेस मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता धावतील.
 
काय बंद राहणार
मुंबई, ठाण्यात मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार. 
दुकाने खुली ठेवण्याची वेळ ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आली. 
हॉटेल्समध्येही क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना बसण्यास परवानगी.
 
अनलॉकच्या दोन दिवसांच्या गोंधळानंतर राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नवीन मार्गदशक तत्त्वे लागू केली. त्यानुसार करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायू खाटांची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे निर्बंध किती शिथिल करायचे याचा निर्णय दर आठवड्याला घेतला जाईल.