शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (14:59 IST)

BSNLची स्वस्त योजना! फक्त 49 रुपयांमध्ये महिनाभर कॉलिंग तसेच इंटरनेट डेटाही मिळेल...

बीएसएनएलची 49 रुपये रिचार्ज योजनाः बीएसएनएलची ही अगदी स्वस्त रिचार्ज योजना आहे, ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे. या रिचार्ज योजनेत वापरकर्त्याला 28 दिवसांची वैधता दिली जाते. या रिचार्ज योजनेत वापरकर्त्याला 100 मिनिटांचा टॉकटाईम व 2 GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह देण्यात आला आहे.
 
यासह, यामध्ये वापरकर्त्याला 100 एसएमएस देखील देण्यात आले आहेत. योजनेत दिलेला टॉक टाइम वापरकर्त्याद्वारे इतर कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
 
जिओची 129 रुपयांची योजना
रिलायन्स जिओची ही योजना 129 मध्ये आली असून त्यामध्ये 28 दिवसांची वैधता वापरकर्त्यास देण्यात आली आहे. या योजनेत वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस देण्यात आले आहेत. यामध्ये टॉकटाइम मिनिटांऐवजी संपूर्ण 28 दिवस अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. यासह, वापरकर्त्यास त्यात जियो अॅप्सची विनामूल्य सदस्यता देखील मिळते.
 
Viची 149 रुपयांची योजना
व्होडाफोन-आयडिया 149 रुपयांच्या या योजनेत वापरकर्त्याला 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यात यूजरला 2 जीबी डेटासह अमर्यादित कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच, वापरकर्त्यास 28 दिवसांसाठी 300 एसएमएस मिळतात. या व्यतिरिक्त या योजनेत वापरकर्त्याला Vi Movies & TV बेसिकची मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे.