गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (20:56 IST)

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा पथके तैनात राहणार

मुंबई – पुणे महामार्गावर अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार असून, एखादा अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणे शक्य होणार आहे.
 
मुंबई – पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई – पुणे महामार्गावर 24 तास सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यासाठी एकूण बारा पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. 1डिसेंबरपासून मुंबई – पुणे महामार्गावर सुरक्षा पथक तैनात करण्यात येणार आहेत. त्याच सोबत काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. रोज होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. लाईन कटिंग हे मुंबई – पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघाताच प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. लाईन कटिंगला आळा बसावा यासाठी देखील शासनातर्फे उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 
मुंबई – पुणे महामागार्वर वाढत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महामार्गावर पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. ही पथके या ठिकाणी 24 तास उपलब्ध असणार आहेत. यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहेच पण त्या सोबतच जर एखादा अपघात झाला, तर अपघातग्रस्तांना त्वरित मदतसुद्धा मिळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor