बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (20:02 IST)

Himachal Pradesh Election 2022 : 142 बूथवर फक्त महिला पोलीस कर्मचारी तैनात करणार

Himachal Pradesh Election 2022 हिमाचल विधानसभा निवडणुकीत 142 महिला बूथवर फक्त महिला पोलीस तैनात असतील. हिमाचलच्या एकूण 7881 मतदान केंद्रांवर हिमाचलचे 27 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जबाबदारी सांभाळतील. अतिसंवेदनशील आणि इतर काही बूथवर केंद्रीय निमलष्करी दलाचे जवानही तैनात केले जातील. 
 
केंद्रीय पोलीस दलाच्या 25 कंपन्या हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचल्या आहेत. प्रत्येक बुथवर 5 ते 7 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीदरम्यान शांतता राखण्यासाठी तसेच बाहेरील राज्यांमधून प्रतिबंधित दारू आणि अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी आणखी कंपन्यांना पाचारण करण्यात येणार आहे.
 
विधानसभा निवडणुकीत हिमाचलमध्ये 67 कंपन्यांना बोलावण्याचा प्रस्ताव आहे. तसेच एका कंपनीत सुमारे 100 कर्मचारी आहेत.