शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (08:58 IST)

राज्यातून गेल्या महिन्यात 3 हजार 594 तरुणी बेपत्ता- रुपाली चाकणकर

rupali chakarnkar
महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे, असं म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे.
 
महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहीम राबवावी, दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली.
 
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
 
राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी, अशी विनंती चाकणकर यांनी केली आहे. पाहिजे तशी तत्परता राज्य सरकारकडून दाखवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या.
 
या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही, असंही चाकणकरांनी म्हटलं आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.
 


Published By- Priya Dixit