संबंधित माहिती
- बर्फवृष्टीत पर्यटकांच्या गाड्या अडकल्या, थंडीमुळे गोठून कारमध्ये 10 मुलांसह 21 जणांचा मृत्यू
- टाटा मोटर्सच्या आगामी सीएनजी कार या दिवशी लॉन्च होतील
- कमी बजेटमध्ये सर्वोत्तम SUV, 10 लाखां खालील टॉप-5 कार
- चेहऱ्यावर मुरुमाचे डाग असल्यास या टिप्स अवलंबवा
- 12 कोटींची परदेशी बनावटीची गाडी वापरणाऱ्यांनी फकीर म्हणवून घेऊ नये - संजय राऊत
30 हजाराची 'मिनी फोर्ड'
social media
अशोक आवटी यांचे कर्नाल रस्त्यावरील काकानगर येथे दुचाकी व चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. त्यांच्या फावल्या वेळात काहीतरी वेगळं करण्याची आवड आवटी यांच्या मनात अली. त्यांच्या मनात जुनी फोर्ड गाडी बसली आणि यासाठी त्यांनी या गाडीला M80 मोपेडचे इंजिन बसवले आहे. रिक्षाचे सुटे भाग वापरले. ते या गाडीला बनवण्यासाठी दोन वर्षे लढत होते. मात्र प्रत्यक्षात या गाडीचे काम 15 दिवसांपूर्वी पूर्ण झाले.
ही आलिशान कार एकावेळी चार प्रवासी घेऊन जाऊ शकते. कारची बॉडी बनावट आहे आणि मजबुतीकरणासाठी आतील बाजूस कोन केलेले लोखंड आहे. सेम टू सेम पहिल्या दृष्टीक्षेपात ही गाडी फोर्ड कंपनीची आठवण करून देते. गाडीकडे बघितल्यावर हि गाडी ऐतिहासिक वाटते. त्यावरील रंग आणि चित्रेही ऐतिहासिक शैलीतील आहेत.
