गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (15:35 IST)

बर्फवृष्टीत पर्यटकांच्या गाड्या अडकल्या, थंडीमुळे गोठून कारमध्ये 10 मुलांसह 21 जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील मुर्री  येथे पर्यटकांच्या गर्दीत बर्फात अडकलेल्या कारमध्ये किमान 21 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान सरकारने मुर्री येथे शनिवारी घडलेल्या या घटनेला आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या हिल स्टेशनवर सुमारे 1000 गाड्या अजूनही अडकल्या आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्याला गती देण्याच्या आणि अडकलेल्या पर्यटकांना मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, खैबर पख्तुनख्वाच्या गल्यातमध्ये कारच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. रेस्क्यू 1122 ने जाहीर केलेल्या यादीनुसार दहा  मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानचे लष्कर रस्ते मोकळे करण्याचा आणि मुर्रीच्या डोंगरी शहराजवळ अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. या हिमस्खलनात सुमारे 1,000 वाहने महामार्गावर अडकून पडल्याचे गृहमंत्री शेख रशीद यांनी सांगितले. मुर्री हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेला एक हिल रिसॉर्ट शहर आहे.
गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितले की, पर्यटक इतक्या मोठ्या संख्येने "15 ते 20 वर्षांत प्रथमच, हिल स्टेशनवर आले होते,ज्यामुळे मोठे संकट निर्माण झाले." ते म्हणाले की रावळपिंडी आणि इस्लामाबाद प्रशासन, पोलिसांसह, अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे काम करत आहेत, तर पाकिस्तानी लष्कराच्या पाच प्लाटून तसेच रेंजर्स आणि फ्रंटियर कॉर्प्सला आपत्कालीन आधारावर पाचारण करण्यात आले होते. मंत्री म्हणाले की हिल स्टेशनवर सुमारे 1,000 गाड्या अडकल्या आहेत. अहमद म्हणाले की, मुरीच्या रहिवाशांनी अडकलेल्या पर्यटकांना अन्न आणि ब्लँकेट पुरवले जात आहेत. प्रशासनाने हिल स्टेशनकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले असून आता फक्त खाद्यपदार्थ आणि ब्लँकेट घेऊन जाणाऱ्या वाहनांना परवानगी दिली जात आहे.