लज्जास्पद : नागपुरात ३० वर्षीय व्यक्तीने घोड्यासोबत केले घृणास्पद कृत्य
महाराष्ट्रातील नागपुरात एका ३० वर्षीय व्यक्तीला घोड्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुरूषावर घोड्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्यातील घोडेस्वारी अकादमीमध्ये घोड्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना १७ मे रोजी गिट्टीक्वारी परिसरातील नागपूर जिल्हा घोडेस्वार संघटनेत घडली. घोडेस्वारी अकादमी चालवणाऱ्या तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा रक्षकाने रात्रीच्या वेळी आरोपीला आवारात येताना पाहिले आणि त्याला माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका घोड्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसला होता. त्यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik