गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 जुलै 2022 (13:35 IST)

सोलापूर-गाणगापूर एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात 35 प्रवासी जखमी

accident
Solapur - Gangapur Accident - सोलापूर -गाणगापूर एसटी बसचा आज सकाळी अक्कलकोट-मेंदर्गी मार्गावर देशमुख शेतालगत एसटी बस पलटी होऊन अपघात झाला. या बस मध्ये 70 प्रवासी होते. या अपघातात 35 प्रवासी जखमी झाले असून जखमींना अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 5 प्रवाशांची  प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस पलटी झाल्यामुळे बसचे नुकसान झाले आहे. 
 
अक्कलकोट मैंदर्गी रोडवर झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. "रुग्णवाहिका सोबतच मिळेल त्या वाहनाने जखमीना रुग्णालयात पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टर उपस्थित होते. जखमींची संख्या पाहून खाजगी डॉक्टरांना तात्काळ पाचारण करण्यात आले आहे. गंभीर जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे