1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

३५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; १० मुलांची प्रकृती गंभीर

350 students suffering from food poisoning in Thane
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भातसई आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना अन्नातून 350 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. 55 विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून 10 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भातसई आश्रम शाळेतील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण दिले होतं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली.
 
काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्याने मुख्याध्यापक व अधीकक्षकांनी शहापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल केलं. मात्र यापैकी 10 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
 
गुलाबजामधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. तर 10 मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. 350 विद्यार्थ्यांना आज दुपारच्या सत्रात डाळ, भात, भाजी, गुलाबजाम असे जेवण देण्यात आले  होते .
 
 शाळेतील विद्यार्थ्यांना पोटामध्ये अचानाक त्रास झाल्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला होता.  दरम्यान या घटनेमुळे  आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.