सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यांना मिळणार 'जागतिक वारसा' स्थळाचा दर्जा, युनेस्कोकडे प्रस्ताव

sindhudurg fort
2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 'मराठा मिलिटरी लँडस्केप' हे भारताचे नामांकन असेल, असे सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक वारशाचा समावेश आहे.
 
त्यामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड किल्ला, खांदेरी किल्ला, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूचा जिंजी किल्ला याचा समावेश आहे.
 
महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले असून त्यापैकी फक्त 12 किल्ले भारताच्या 'मराठा लष्करी परिस्थिती' अंतर्गत निवडले गेले आहेत. 17व्या ते 19व्या शतकात बांधलेले हे किल्ले मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करतात. यापैकी आठ किल्ले – शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी किल्ला हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून संरक्षित आहेत. तर साल्हेर किल्ला, राजगड, खांदेरी किल्ला आणि प्रतापगड हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून संरक्षित आहेत.
 
या किल्ल्यांना मराठा लष्करी लँडस्केपच्या सांस्कृतिक बेंचमार्क श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यात साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, रायगड, राजगड आणि जिंजी किल्ल्यासारख्या डोंगरी किल्ल्यांचा समावेश आहे. प्रतापगड हा डोंगरी-जंगली किल्ला आहे, पन्हाळा हा डोंगरी-पठारी किल्ला आहे आणि विजयदुर्ग हा किनारी किल्ला आहे. तर खांदेरी किल्ला, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बेट किल्ले आहेत.
 
मराठा लष्करी विचारसरणीची सुरुवात 17व्या शतकात मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 1670 CE मध्ये झाली आणि ती 1818 CE पर्यंत पुढे पेशव्यांच्या राजवटीत चालू राहिली. 
 
सध्या भारतात 42 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे आहेत, 7 नैसर्गिक स्थळे आहेत तर एक मिश्रित स्थळे आहेत.
 
महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 5 सांस्कृतिक आणि एक नैसर्गिक आहे. यामध्ये अजिंठा लेणी (1983), एलोरा लेणी (1983), एलिफंटा लेणी (1987), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (2004), व्हिक्टोरियन गॉथिक एंड आर्ट डेको एन्सेंबल्स ऑफ मुंबई (2018), महाराष्ट्राचा पश्चिम घाट (2012) जो कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळपर्यंत पसरलेला आहे. हे नैसर्गिक श्रेणीमध्ये समाविष्ट आहे.