शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (11:29 IST)

महाराष्ट्रात भूकंम्पाचे धक्के, रिश्टर स्केल वर 4.3 ची तीव्रता घरात मॅच बघत असलेले लोक घाबरून बाहेर पळाले

4.3 magnitude earthquake shakes Maharashtra महाराष्ट्रात भूकंम्पाचे धक्के
गडचिरोली. महाराष्ट्रात रविवारी . भूकंपाचे धक्के जाणवले होते  यामुळे लोकांची धावपळ झाली. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार हा भूकंप महाराष्ट्रातील गडचिरोली येथे झाला आहे. सायंकाळी उशिरा 6.48 च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली. भूकंप झाला तेव्हा लोक घरात बसून भारत-न्यूझीलंड सामना पाहत होते . पृथ्वी हादरताच लोक घाबरून घरातून पळून मोकळ्या आकाशाखाली आले. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.